|
कार्कळ (कर्नाटक)- कार्कळ तालुक्यातील मुंड्कुरू गावातील सच्चेरिपेटेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ईद-ए-मिलाद निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. हिंदु संघटनांकडून याविषयी अप्रसन्नता व्यक्त करण्यात आली. शाळेचे संचालक हे भाजपचे स्थानिक नेते असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच हा कार्यक्रम पार पडला. ते कार्यक्रमाच्या मंचावर सहभागी झाल्यामुळेही संताप अधिक वाढला आहे. या कार्यक्रमात हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक पुढे बसवण्यात आले, असा आरोप पालकांनी केला.
शाळा आणि आयोजक यांच्याविरुद्ध कारवाई करावी ! – श्री. प्रमोद मुतालिक
श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक या घटनेविषयी म्हणाले की, हा प्रकार हिंदु विद्यार्थ्यांना इतर धर्मियांचे अनुयायी बनवण्याचा प्रयत्न आहे. संबंधित विभाग आणि शिक्षण अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन आयोजकांवर आणि शाळेवर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, अशी चेतावणीही श्री. मुतालिक यांनी दिली.