‘Mini Pakistan’ Karnataka HC Remark : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागाला संबोधले ‘पाकिस्तान’  !

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडून उत्तर मागितले !

नवी देहली –  बेंगळुरूतील मुसलमानबहुल भागांना ‘पाकिस्तान’ असे संबोधणार्‍या कर्नाटक उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या टिप्पणीची नोंद घेत उत्तर मागितले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रर जनरल’कडून या संदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे.

१. कर्नाटक उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती श्रीशानंद यांचे २ व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहेत. एका व्हिडिओत ते बेंगळुरूतील मुसलमानबहुल भागाला ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे, तर दुसर्‍या व्हिडिओत ते महिला अधिवक्त्याविषयी असंवेदनशील टीप्पणी केल्याचे दिसून आले.

२. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाची नोंद घेत अटॉर्नी जनरल आर्. वेंकटरमणी यांना सांगितले की, आम्ही काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करू शकतो. सामाजिक माध्यमांच्या या युगात आपल्यावर (न्यायालयांवर) बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि आपण त्यानुसार वागले पाहिजे.

काय म्हणाले होते न्यायमूर्ती वेदव्यासाचार श्रीशानंद  ?

न्यायमूर्ती वेदव्यासाचार श्रीशानंद सुनावणीच्या वेळी म्हणाले की, मैसुरू रोडवरील पुलाकडे जा आणि बघा, प्रत्येक रिक्शामध्ये १० लोक बसलेले असतात. येथे कायदा लागू होत नाही; कारण मैसुरू रोडवरील पूल गोरीपालळ्यापासून डावीकडे बाजारात जातो. ते पाकिस्तानात आहे, भारतात नाही. ही वस्तूस्थिती आहे. तिथे कितीही कडक पोलीस अधिकार्‍यांची नेमणूक केली, तरी त्यांना मारहाण केली जाते. (जेथे पोलिसांची ही स्थिती असेल, तेथे सर्वसामान्य हिंदूंची काय स्थिती असेल ?, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना असे का म्हणावे लागले ?, यावर देशभरात चर्चा झाली पाहिजे. देशातील जनतेचीही अशीच मानसिकता असल्याचे दिसून येते. याला कोण उत्तरदायी आहे आणि का ?, हेही समोर आले पाहिजे !