नेपाळ चीनऐवजी भारताकडून कोरोनाविरोधी लस घेण्याची शक्यता

चीननेदेखील नेपाळला लस पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले आहे; मात्र चीनपेक्षा भारतावर अधिक विश्‍वास व्यक्त करून नेपाळ चीनला धक्का देण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जात आहे !

नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र आणि राजेशाही यांच्या पुनर्स्थापनेसाठीच्या आंदोलनाला धार !

काठमांडू, पोखरा, बुटवल, इटहरी, धरान, भैरहवा, विराटनगर, बीरगंज आदी भागांमध्ये ही आंदोलने चालू आहेत. नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची पूर्वी स्थापना करणारे पृथ्वी नारायण शहा यांचे चित्र घेऊन लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत.

उत्तरप्रदेशमधून एका घुसखोर रोहिंग्याला अटक

देशात सहस्रो रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरी केली असतांना एकाला अटक करण्यातून काय साध्य होणार ? घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साहाय्य करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांचाही शोध घ्या आणि त्यांना देशद्रोही घोषित करून आजन्म कारागृहात टाका !

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे कर्तव्य बजावत होतो ! – ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित

‘कर्तव्य म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही मला कारागृहात टाकले गेले आणि आतंकवादी असल्याचा ठपका ठेवून छळवणूक करण्यात आली’ – ले. कर्नल पुरोहित

(म्हणे) ‘आमचा शेजारी देश धार्मिक हिंसाचार घडवत आहे !’ – इम्रान खान यांचा भारताचे नाव न घेता आरोप

खाण कामगारांच्या हत्येची जबाबदारी सुन्नी समाजातील इस्लामिक स्टेटने घेतली असूनसुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भारतावर टीका करून इम्रान खान वस्तूस्थिती लपवू शकत नाहीत ! शिया संघटना यास विरोध का करत नाहीत ?

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रकरणी आज न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता

शाही ईदगाह मशीदच्या आक्षेपावर श्रीकृष्ण विराजमानने ‘याचिका न्यायालयाकडून स्वीकारण्यात आलेली असल्याने हा दावाच चुकीचा आहे’, असा प्रतिवाद केला. न्यायालय शाही ईदगाह मशिदीच्या आक्षेपाचा अभ्यास करून आज निर्णय देणार आहे – झी न्यूज

(म्हणे) ‘शहराचे नाव पालटून तेथील वातावरण बिघडवू नका !’ – बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्यावर कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याला आणि वातावरण बिघडायला ते औरंगजेबाचे वंशज आहेत का ?

४३ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून हडपली ४ हेक्टर भूमी

शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरी कधी संपू शकते का ?

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना अग्निहोत्र प्रचारक गोविंद आपटे यांच्याकडून शिवपुरी येथे भेट देण्याचे निमंत्रण !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची संभाजीनगर येथील अग्निहोत्र प्रचारक आणि न्यूरोथेरपीस्ट श्री. गोविंद आपटे यांनी ६ जानेवारी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर येथील बसगाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिकटवले नामांतर न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी

तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ६ जानेवारी या दिवशी संभाजीनगर येथे जाणार्‍या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटवले.