श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रकरणी आज न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता

श्रीकृष्णजन्मभूमी

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयात ७ जानेवारीला जवळपास १ घंटे झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘श्रीकृष्ण विराजमान’कडून बनवण्यात आलेले पक्षकार सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, शाही ईदगाह मशीद, मथुरा; श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्ट आणि श्रीकृष्णजन्मभूमी सेवा संस्थान यांच्या अधिवक्त्यांनी त्यांची बाजू मांडली. शाही ईदगाह मशीद यांच्याकडून श्रीकृष्ण विराजमानच्या याचिकेला चुकीचे ठरवण्यात येऊन आक्षेप नोंदवण्यात आला. या याचिकेतून श्रीकृष्ण विराजमान यांनी श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीवर दावा केला आहे. सध्या या भूमीवर ईदशाह मशीद आहे.

शाही ईदगाह मशीदच्या आक्षेपावर श्रीकृष्ण विराजमानने ‘याचिका न्यायालयाकडून स्वीकारण्यात आलेली असल्याने हा दावाच चुकीचा आहे’, असा प्रतिवाद केला. न्यायालय शाही ईदगाह मशिदीच्या आक्षेपाचा अभ्यास करून ८ जानेवारीला यावर निर्णय देणार आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.