
नगर – येथील तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ६ जानेवारी या दिवशी संभाजीनगर येथे जाणार्या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटवले. औरंगाबाद नामांतराच्या संदर्भात ठोस भूमिका घेण्यात येत नाही. त्यामुळे मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘नामांतराच्या संदर्भात कोणताही निर्णय होत नसल्याने बसगाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिकटवण्यात आले. याची नोंद घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी देण्यात आली.
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद