पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना अग्निहोत्र प्रचारक गोविंद आपटे यांच्याकडून शिवपुरी येथे भेट देण्याचे निमंत्रण !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी (डावीकडे) यांना अग्निहोत्राचे पुस्तक भेट देतांना श्री. गोविंद आपटे (उजवीकडे)

सांगली, ६ जानेवारी (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची संभाजीनगर येथील अग्निहोत्र प्रचारक आणि न्यूरोथेरपीस्ट श्री. गोविंद आपटे यांनी ६ जानेवारी सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. आपटे यांनी शिवपुरी येथील गुरुपरंपरा, अग्निहोत्र यांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी अक्कलकोट येथील गुरुपरंपरेतील डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांच्या वतीने श्री. गोविंद आपटे यांनी पू. भिडेगुरुजी यांना शिवपुरी येथे येण्याचे आमंत्रण दिले. या प्रसंगी श्री. आपटे यांनी पू. भिडेगुरुजी यांना अग्निहोत्र पुस्तक भेट दिले. पू. भिडेगुरुजी यांनी श्री. आपटे यांच्या कार्याचे कौतुक करून लवकरच भेटीचे नियोजन करू, असे सांगितले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना श्री. गोविंद आपटे (उजवीकडे)

या वेळी त्यांच्या समवेत पुणे (नवी सांगवी) येथील श्री. विवेक जोशी, ईश्‍वरपूर येथील श्री. रघुनाथ दिंडे, सांगली येथील अग्निहोत्र प्रचाराक आणि पत्रकार श्री. सुधीर मोहिते उपस्थित होते.

विशेष

श्री. गोविंद आपटे हे अग्निहोत्राच्या प्रचारासाठी २२ दिवस आसाम येथे गेले होते. श्री. आपटे यांच्याकडे संभाजीनगर येथे भारतातील पहिले अग्निहोत्र मंदिर आहे.