मंगळुरू (कर्नाटक) येथील मंदिराला केळी पुरवण्याचे कंत्राट मुसलमान व्यापार्‍याला दिल्याने वाद !

 मुसलमानांनी कधी मशिदीच्या संदर्भातील कुठले कंत्राट हिंदूंना दिल्याचे ऐकिवात आहे का ?

दक्षिण कन्नड जिल्ह्यात अवैधपणे वास्तव्य करणार्‍या परदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करा ! – कर्नाटकचे गृहमंत्री

‘व्हिसा’ची मुदत संपूनही आणि वैध कागदपत्रे नसतांनाही कर्नाटकात रहाणार्‍या परदेशी नागरिकांचा शोध घेणे, हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असल्याचे ज्ञानेंद्र म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचे विभाजन होणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर आल्यानंतर उत्तरप्रदेश राज्याचे ५, महाराष्ट्राचे २ आणि कर्नाटक राज्याचे २ तुकडे करून नवीन राज्ये निर्माण करण्याची भाजपची योजना आहे.

हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या काँग्रेसच्या नेत्या व्ही. शैलजा यांच्या घरावर दगडफेक

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा विचार राज्य आणि केंद्र सरकार यांनी करणे आवश्यक आहे. श्रद्धास्थानांच्या निंदेच्या प्रकरणी भारतात कोणताही कठोर कायदा नाही.

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाले नसल्यास ‘अ‍ॅट्रोसिटी’ कायदा लागू होणार नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटक उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमाती यांविषयीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले, ‘सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाले, तरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रोसिटी) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करता येणार आहे.’

बेंगळुरू येथे पाकिस्तानला सैन्याविषयी गोपनीय माहिती पुरवणार्‍या शराफुद्दीन याला अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

गौंडवाड (जिल्हा बेळगाव) येथे युवकाच्या हत्येनंतर हिंसाचार !

सतीश पाटील यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने काही वाहने, तसेच काही घरे यांना आग लावून दिली. या प्रकरणी हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी ४ लोकांना, तर आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.

कर्नाटकात जनता दलच्या आमदाराने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात !

एका प्राचार्यांना अशा प्रकारे वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य जनतेला कशी वागणूक मिळत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! लोकप्रतिनिधी हे जनतेचे रक्षक नसून भक्षक झाल्याचेच हे उदाहरण ! अशा आमदारांवर कठोर कारवाई आवश्यक !

सुधारणा अप्रिय वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगले ! – पंतप्रधान

पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी १५ सहस्र लोकांसमवेत केला योगा

भारतासह जगभरात २१ जून या दिवशी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकातील ‘मैसुरू पॅलेस मैदाना’वर गेले होते. त्यांनी जवळपास १५ सहस्र लोकांसमवेत योगा केला.