गौंडवाड (जिल्हा बेळगाव) येथे युवकाच्या हत्येनंतर हिंसाचार !

सतीश पाटील

बेळगाव – बेळगावजवळ असलेल्या काकती जवळच्या गौंडवाड या गावात दोन दिवसांपूर्वी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता सतीश पाटील यांची देवस्थानच्या भूमीच्या वादातून हत्या करण्यात आली. सतीश पाटील यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने काही वाहने, तसेच काही घरे यांना आग लावून दिली. या प्रकरणी हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी ४ लोकांना, तर आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या संदर्भात दैनिक ‘तरुण भारत’ने दिलेल्या वृत्तात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच या युवकाची हत्या झाली, तसेच युवकाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना मारहाण केल्याचे म्हटले आहे.