दक्षिण कन्नड जिल्ह्यात अवैधपणे वास्तव्य करणार्‍या परदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करा ! – कर्नाटकचे गृहमंत्री

कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र

मंगळुरू – कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या पोलिसांना जिल्ह्यात अवैधपणे रहाणार्‍या परदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. ‘व्हिसा’ची मुदत संपूनही आणि वैध कागदपत्रे नसतांनाही कर्नाटकात रहाणार्‍या परदेशी नागरिकांचा शोध घेणे, हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट असल्याचे ज्ञानेंद्र म्हणाले.

गृहमंत्री यांनी सांगितले की, पोलिसांना ‘परदेशी नागरिकांकडे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र आहेत का’, हे शोधून काढावे लागेल. या प्रकरणी पोलिसांना दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी जिल्हा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. बेंगळुरूमध्ये असे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

असे निर्देश का द्यावे लागतात ? पोलिसांना हे स्वत:हून कसे लक्षात येत नाही ?