मंगळुरू (कर्नाटक) येथील मंदिराला केळी पुरवण्याचे कंत्राट मुसलमान व्यापार्‍याला दिल्याने वाद !

हिंदु संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

मंगळुरू – येथील कुडुपीमधील श्री अनंतपद्मनाभ मंदिरात केळी पुरवण्याचे कंत्राट एका मुसलमान व्यापार्‍याला दिल्याचे उघड झाल्याने वाद निर्माण झाला. मंदिर व्यवस्थापनाने १ जुलै २०२१ ते ३० जून २०२२ या एक वर्षाच्या कालावधीसाठी मंदिरात नियमितपणे केळींचा पुरवठा करण्यासाठी सर्वांत अल्प बोली लावणार्‍याला कंत्राट दिले होते. (देवासाठी नैवेद्य बनवतांना तो अधिकाधिक सात्त्विक कसा बनवता येईल, हे पहाणे आवश्यक आहे; परंतु सध्या या गोष्टींचा अभाव दिसतो. त्यामुळे ‘अल्प बोली’ या एकाच निकषावर कंत्राट दिले जाते. यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

यावर हिंदु संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले जगदीश यांनी आंदोलकांची समजूत काढली. सध्याचा करार संपुष्टात आल्यानंतर, म्हणजे ३० जून २०२२ नंतर या समस्येचे निराकरण केले जाईल, असे त्यांनी आंदोलकांना सांगितले. या आश्‍वासनामुळे हिंदु संघटनांचा विरोध मावळला असल्याचे मंदिराच्या प्रशासनाने सांगितले.

संपादकीय भूमिका

 मुसलमानांनी कधी मशिदीच्या संदर्भातील कुठले कंत्राट हिंदूंना दिल्याचे ऐकिवात आहे का ?