सुधारणा अप्रिय वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम चांगले ! – पंतप्रधान

अग्नीपथ योजनेच्या विरोधात चालू असलेल्या गदारोळाचे प्रकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या कर्नाटक राज्याच्या दौर्‍यावर असतांना एका कार्यक्रमात ‘अग्नीपथ’ या सैन्यभरतीच्या योजनेच्या विरोधात चालू असलेल्या गदारोळाचा नामोल्लेख न करता वक्तव्य केले. पंतप्रधान म्हणाले, ‘कोणतेही निर्णय अथवा सुधारणा तात्कालिक अप्रिय वाटल्या, तरी काळानुसार त्यांचे चांगले आणि दूरगामी परिणाम देश अनुभवत आहे.’

पंतप्रधान पुढे म्हणाले की, नवीन उद्योगधंदे आणि नुतनीकरण (इनोव्हेशन) यांसाठी गेली ८ वर्षे केले गेलेले प्रयत्नही सोपे नव्हते. सुधारणांमुळे आपल्याला नवीन उद्दिष्टे आणि संकल्प यांच्याकडे मार्गक्रमण करता येते. या वेळी त्यांनी अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्रांचा उल्लेख केला. ‘हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की, चांगल्या हेतूंनी आणलेल्या अनेक चांगल्या योजना राजकीय रंगांमध्ये अडकतात. प्रसारमाध्यमेही यामध्ये ओढली जातात’, अशी खंतही मोदी यांनी या वेळी व्यक्त केली.