हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या काँग्रेसच्या नेत्या व्ही. शैलजा यांच्या घरावर दगडफेक

हिंदूंच्या देवतांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणार्‍या काँग्रेसच्या व्ही. शैलजा यांच्या घरावर अज्ञातांची दगडफेक

पुत्तूरू (कर्नाटक) – हिंदूंच्या देवतांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणार्‍या काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान शाखेच्या सचिव व्ही. शैलजा यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. यात त्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच भिंतींवर काळी शाई फेकण्यात आली.

यापूर्वीच शैलजा यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानांवरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शैलजा यांच्यासह अन्य ३ जणांनी भगवान श्रीराम, हनुमान आणि सीतामाता यांच्याविषयी १६ जून या दिवशी एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांनी नेमकी काय आक्षेपार्ह विधाने केली, हे समजू शकले नाही.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा विचार राज्य आणि केंद्र सरकार यांनी करणे आवश्यक आहे. पाकमध्ये ईशनिंदेच्या (श्रद्धास्थानांच्या निंदेच्या) प्रकरणी फाशीची शिक्षा करणारा कायदा आहे; मात्र भारतात कोणताही कठोर कायदा नाही, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !