सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी घेतले तिरुपती मंदिरात भगवान श्री व्यंकटेश्‍वराचे दर्शन !

भारताचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी येथील तिरुपती मंदिरात जाऊन भगवान श्री व्यंकटेश्‍वराचे दर्शन घेतले.

आंध्रप्रदेश सरकार आणि पोलीस यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारने त्याचे ख्रिस्तीप्रेम उघड करणार्‍या स्वपक्षातील खासदाराला अधिकारांचा दुरुपयोग करून अटक केली. ही सरकारची मोगलाई असून हा लोकशाहीचा अवमानच आहे. यासाठी न्यायालयाने संबंधितांना शिक्षा केली पाहिजे !

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथील आयुर्वेदीय औषधामुळे २ दिवसांत बरा होतो कोरोना रुग्ण !

कृष्णापट्टणम् गावामध्ये कोरोनावरील आयुर्वेदीय औषध घेण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोकांना ३ किमी अंतरापर्यंत रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे. ‘या औषधाने कोरोना बरा होतो’, असा दावा औषध घेणार्‍यांनी, तसेच औषध बनवणारे वैद्य बोगिनी आनंदय्या यांनी केला आहे.

आंध्रप्रदेशातील धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणारे खासदार रघुराम कृष्णम् राजू यांचा पोलीस कोठडीत छळ !

आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात याहून वेगळे काय घडणार ? याचा देशातील हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !

आंध्रप्रदेशामध्ये ऑक्सिजनपुरवठा बंद पडल्याने १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

राज्यातील अनंतपूर आणि कुर्नूल येथे ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने एकूण १६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. अनंतपूर येथील सरकारी रुग्णालयात ११, तर कुर्नूल येथील खासगी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला.

अमरावती (आंध्रप्रदेश) येथे रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवरून नेऊन अंत्यसंस्कार !

राज्यातील श्रीकाकुळम् येथे मृत झालेल्या ५० वर्षीय महिलेचा मृतदेह नेण्यास रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवरून तो स्मशानभूमीत नेण्यात आला. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश एन्.व्ही. रामण्णा यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन !

देशाच्या सरन्यायाधिशांनी मंदिरात जाऊ नये, अशा प्रकारची मागणी पुरो(अधो)गाम्यांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

तिरुपती मंदिरात दान केल्या जाणार्‍या केसांची चीनमध्ये होणार्‍या तस्करीमागे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसमधील नेत्यांचा सहभाग !

आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस हा ख्रिस्तीधार्जिणा पक्ष असल्याने अशी घटना हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिराच्या संदर्भात घडत असेल, तरी केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य उघडकीस आणले पाहिजे.

वेब सिरीजने प्रेरित होऊन स्वतःला नक्षली कमांडर म्हणवून सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या सैनिकाला अटक

आंध्रप्रदेशच्या विजयानगरम् जिल्ह्यातील पर्वतीपूरम्मधील सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्यासाठी माओवादी कमांडर असल्याचे भासवणार्‍या सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

तिरुपती बालाजी मंदिरातील भाविकांच्या अर्पण केलेल्या केसांची चीनमध्ये तस्करी

अशा प्रकारची तस्करी हिंदूंच्या प्रमुख धार्मिक स्थळामधून होते, हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! उद्या अशा कुचकामी सुरक्षायंत्रणेमुळे आतंकवादी आक्रमण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !