(म्हणे) ‘आता प्रत्येक मुसलमान तरुणाला अटक केली जाईल !’ – असुदुद्दीन ओवैसी

असुदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर – ‘पी.एफ्.आय.’वरील बंदी धोकादायक आहे. या बंदीचे मी समर्थन करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ‘एम्.आय.एम्.’चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी ‘पी.एफ्.आय’वरील बंदीविषयी व्यक्त केली आहे. ‘मनापासून बोलणार्‍या प्रत्येक मुसलमानावर ही बंदी आहे. आता प्रत्येक मुसलमान तरुणाला ‘अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्या’खाली अटक केली जाईल’, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • हे विधान म्हणजे मुसलमानांना चिथावण्याचाच भाग नव्हे का ? ‘पी.एफ्.आय’चे समर्थन करणार्‍या अशांवरही सरकारने कारवाई केली पाहिजे !