तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर पक्षाचे रंग लावले !

सत्ताधारी ख्रिस्ती वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचा हिंदुद्रोह !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – तिरुपती येथील रस्त्याला लागून असणार्‍या भिंतीवर पूर्वी भगवान शिव, हनुमान, अन्य देवता यांची चित्रे, तसेच शिवलिंग रेखाटण्यात आले होते; मात्र आता त्यावर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचा निळा, हिरवा आणि पांढरा रंग देण्यात आला आहे. याला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध केला जात आहे. सामाजिक माध्यमांतूनही याला विरोध केला जात आहे. या प्रकरणाला विरोध करणारे स्थानिक माजी आमदार आणि त्यांचे समर्थक यांना पोलिसांनी अटकही केली.


आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी या भिंतीचे छायाचित्र त्यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हे आश्चर्य व्यक्त करणारे आहे की, ही छायाचित्रे तिरुपती शहरातील आहेत. हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने त्याच्या पक्षाचे रंग लावले आहेत. हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात भाविक संताप व्यक्त करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ?
  • हिंदूंना आतापर्यंत सर्वधर्मसमभावाचे डोस पाजून त्याच्या नशेत गुंग ठेवण्यात आल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदूंनी आता या गुंगीतून बाहेर पडून शुद्धीत यावे आणि अशा घटना परत कुणी करू धजावणार नाही, अशी पत निर्माण करावी !