केदारनाथमध्ये बर्फवृष्टीमुळे शेकडो भाविक अडकले

वाईट हवामान आणि बर्फवृष्टी यांमुळे ८ मे या दिवशी उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा तात्पुरती थांबण्यात आली आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे शेकडो भाविक अडकलेले आहेत.

मंत्रोच्चाराच्या गजरात केदारनाथचे दरवाजे उघडले

वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात केदारनाथ मंदिराचे दरवाजे २९ एप्रिलला सकाळी उघडण्यात आले. या वेळी राज्यपाल के.के. पॉल आणि भाविकांची उपस्थिती होती.

उत्तराखंडच्या काँग्रेसच्या महिला नेत्या महक खान यांच्याकडून लव्ह जिहाद !

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या एका हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण केल्याप्रकरणी उत्तराखंडच्या महिला काँग्रेस सचिव महक खान यांना अटक करण्यात आली आहे.

केदारनाथ येथे हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे ३ एप्रिलला सकाळी हवाईदलाच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह ४ जण किरकोळ घायाळ झाले.

उत्तराखंडमध्ये बलपूर्वक धर्मांतराला शिक्षापात्र गुन्हा ठरवणारे विधेयक संमत

लोकांना खोटी आमिषे दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तराखंड सरकारने ‘धर्मस्वातंत्र्य अधिनियम’ विधेयक संमत केले.

अधिकोषातील (बँकेतील) नोकरी सोडून हुतात्मा सैनिकाची पत्नी सैन्यात भरती होणार

देशासाठी लढतांना वीरमरण आलेले येथील शिशिर मल्ल यांच्या पत्नी संगीता मल्ल यांनी अधिकोषातील (बँकेतील) नोकरी सोडून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहेत.

उत्तराखंडमधील मदरशांकडून अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश करण्याची मागणी

उत्तराखंडमधील मदरशांच्या अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश करावा, अशी मागणी येथील ‘मदरसा वेल्फेअर सोसायटी’ने शासनाकडे केली. ‘मदरसा वेल्फेअर सोसायटी’च्या नियंत्रणाखाली राज्यात २०७ मदरसे असून त्यांत एकूण २५ सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गंगानदीचा पृथ्वीवरील उदयच अस्थी विसर्जनासाठी झाला आहे ! – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरी

गंगानदीचा पृथ्वीवरील उदयच अस्थी विसर्जनासाठी झाला आहे; मग अस्थींचे विसर्जन गंगेत नाही तर कुठे करणार ?, असा प्रश्‍न उपस्थित करत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरी ……

(म्हणे) अस्थी गंगानदीत प्रवाहित करण्याऐवजी भूमीवर एकत्र करून तेथे पूर्वजांच्या नावाने रोप लावावे ! – भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह

अस्थींचे गंगानदीमध्ये विसर्जन करण्याऐवजी ते एकत्र करून त्यावर पूर्वजांच्या नावाने रोप लावावे. येणारी पुढची पिढी त्या रोपातून निर्माण होणार्‍या वृक्षामध्ये त्यांच्या पूर्वजांना पाहील

उत्तर भारतात वर्ष २०२० किंवा २०२२ मध्ये भयंकर दुष्काळ पडण्याची शक्यता ! – भू-वैज्ञानिकाचे निरीक्षण

वर्ष २०२० आणि २०२२ मध्ये उत्तर भारतात पुन्हा एकदा भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे, अशी माहिती एका भू-वैज्ञानिकाने स्वतः केलेल्या संशोधनानंतर मांडली आहे.


Multi Language |Offline reading | PDF