Muslim Protest Against Ramgiri Maharaj : डेहराडून (उत्तराखंड) येथे रामगिरी महाराजांच्‍या विरोधात मुसलमानांकडून आंदोलन

महाराजांना अटक करण्‍यासह ईश्‍वर निंदेच्‍या विरोधात कायदा करण्‍याची मागणी

रामगिरी महाराजांच्‍या विरोधात मुसलमानांकडून आंदोलन

डेहराडून (उत्तराखंड) – महाराष्‍ट्रातील नाशिक येथील कार्यक्रमात रामगिरी महाराजांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍याचा आरोप मुसलमानांकडून केला जात आहे. येथे शेकडो मुसलमानांनी रामगिरी महाराजांच्‍या विरोधात आंदोलन केले. रामगिरी महाराजांना अटक करून कारागृहात टाकण्‍याची मागणी केली.

तसेच देशात ईश्‍वर निंदेच्‍या संदर्भात कायदा करण्‍यासाठी मुसलमानांकडून ३ महिन्‍यांचा मुदत केंद्र सरकारला देण्‍यात आली. ‘कालमर्यादेत कायदा आणला नाही, तर काहीतरी केले जाईल’, अशी धमकीही या वेळी देण्‍यात आली. महाराष्‍ट्रात काही ठिकाणी मुसलमानांनी यापूर्वीच रामगिरी महाराजांच्‍या विरोधात आंदोलन केले आहे.

रामगिरी महाराज

डेहराडूनच्‍या परेड ग्राऊंडवर मुसलमानांकडून हे आंदोलन करण्‍यात आले. मुसलमान सेवा संघटना, जमियत उलेमा-ए-हिंद आणि इमाम-ए-रिसालत या संघटनांनी हे आंदोलन आयोजित केले होते. याला ‘शान-ए-रिसालत’ असे नाव देण्‍यात आले. यात उत्तराखंडचे अनेक मौलाना आणि मुफ्‍ती सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

स्‍वतःच्‍या धार्मिक श्रद्धांचा कथित अवमान झाल्‍यावरून देशभरात संघटित होऊन आंदोलन करणार्‍या मुसलमानांकडून हिंदू काही शिकतील का ?