भारतातील साधू-संतांकडून केंद्र सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी !
हरिद्वार – बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर ढाका आणि चितगाव येथील हिंदूंनी त्यांच्यावरील आक्रमणाच्या विरोधात निदर्शने केली. हिंदूंची मंदिरे, घरे आणि व्यवसाय यांवर आक्रमणे होत असतांना त्यांनी सुरक्षेची मागणी केली. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणी भारतातील साधू-संतांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर आवश्यकता पडल्यास संत समाज बांगलादेशात जाण्यास सिद्ध आहे’, असे महामंडलेश्वर स्वामी प्रबोधानंद गिरी महाराज यांनी सांगितले. भारतातील संत समाजाने बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाविषयी चिंता व्यक्त केली आणि केंद्र सरकारकडे याविषयी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
१. पंचायती आखाडा महानिर्वाणीचे सचिव मनहत पुरी म्हणाले की, केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.
२. महामंडलेश्वर स्वामी यतिंद्रानंद गिरी म्हणाले की, हरिद्वारमध्ये मोठ्या संख्येने रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान रहात आहेत, त्यांनाही देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे, अन्यथा ते देशासाठी मोठा धोका बनू शकतात.
संपादकीय भूमिकाभारतातील जन्महिंदु सुस्त आणि निद्रिस्त असल्यामुळे हिंदु संतांवर असे सांगण्याची वेळ येते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! |