Namibia’s Wildlife Cull : दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी नामीबिया करणार ८३ हत्तींसह ७२३ प्राण्यांची हत्या !

भूकबळी टाळण्यासाठी प्राण्यांचे मांस जनतेला खायला देणार

विंडहोक (नामीबिया) – आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाची सर्वाधिक झळ नामीबिया या देशाला बसली आहे. या देशात लोकांना खायला अन्नही मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत भूकबळीने नागरिकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी नामीबिया ८३ हत्तींसह जंगलातील ७२३ प्राणी मारून त्यांचे मांस नागरिकांना खायला देण्याचा आदेश नामीबिया सरकारने दिला आहे.

नामीबिया सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सरकारने ८३ हत्ती, ३०० झेब्रा, ३० पाणघोडे, ६० म्हशी यांसह एकूण ७२३ प्राणी मारून त्यांचे मांस जनतेला खायला देण्याचा आदेश दिला आहे. अशाप्रकारे प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस जनतेला खायला देण्याची ही पहिलीच वेळ नाही. नामीबियाने यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळात सरकारने २०० हून अधिक प्राण्यांना मारण्याचा आदेश दिला होता.

संपादकीय भूमिका

मानवाला आदिमानवाच्या काळात ढकलणारी हीच आहे का जगात चालू असलेली विकासाची घोडदौड ?