कायरो (इजिप्त) – येथील मिनिया प्रांतात मुसलमान जमावाने ख्रिस्त्यांच्या अनेक घरांना आग लावल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात सामाजिक माध्यमांत अनेक व्हिडिओ प्रसारित झाले असून संतापलेला मुसलमान जमाव ख्रिस्त्यांच्या घरांकडे जातांना आणि गोंधळ घालत त्यांच्यावर आक्रमण करतांना दिसत आहे. ‘न्यू अरब’च्या वृत्तानुसार ख्रिस्त्यांच्या ‘इस्टर’ उत्सवानंतर मुसलमान जमाव आधीच संतप्त झाला होता; परंतु जेव्हा तेथील अल् फवखीर गावात नवीन चर्च बांधण्याची चर्चा चालू झाली, तेव्हा मुसलमान शुक्रवारच्या नमाजानंतर रस्त्यावर उतरले. त्यांनी हिंसाचार करत ख्रिस्त्यांच्या घरांची जाळपोळ चालू केली.
Mu$lims burn the homes of Christians in #Egypt angered over approval for a new church !
Christians in India live well multiple times over, yet India is disparaged as 'anti-Christian' based on events in #Manipur or elsewhere.
Watching such frequent anti-India propaganda, would… pic.twitter.com/eCrYPhsHZG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2024
१. सामाजिक माध्यमांवरून आरोप केले जात आहेत की, जेव्हा जमाव हिंसाचार करत होता, तेव्हा तेथील पोलीस मूक प्रेक्षक झाले होते.
२. या घटनेवरून मिनियाचे आर्चबिशप मकारियोस म्हणाले की, या घटनेनंतर नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती आता नियंत्रणात आली असून संशयितांनाही अटक करण्यात आली आहे.
३. इजिप्तमध्ये मुसलमानांमुळे ख्रिस्त्यांना अनेकदा त्यांच्या अधिकारांवर तुळशीपत्र ठेवावे लागले आहे. ख्रिस्त्यांवरील अत्याचारांच्या अनेक घटना प्रसारमाध्यमांमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. १० वर्षांपूर्वी आर्चबिशप मकारियोस यांच्याही हत्येचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.
४. मुसलमानबहूल इजिप्तची एकूण लोकसंख्या ही १ कोटी ९ लाख असून त्यांपैकी १०-१५ टक्के लोक हे ख्रिस्ती आहेत. ख्रिस्त्यांना विवाह आणि घटस्फोट सोडून अन्य बहुतेक प्रकरणांमध्ये शरीयत कायद्याचेच कायदेशीरपणे पालन करण्यास भाग पाडले जाते. (भारतातील ख्रिस्ती कैक पटींनी चांगले जीवन जगत आहेत, तरी भारताला मणीपूर अथवा अन्यत्र घडणार्या घटनांवरून ‘ख्रिस्तीविरोधी’ म्हणत हिणवले जाते. अशा प्रकारे वारंवार होणारा भारतविरोधी दुष्प्रचार पाहून ‘ख्रिस्त्यांनी भारत सोडून कोणत्याही ख्रिस्ती अथवा मुसलमान देशात चालते व्हावे’, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिकाधर्मांतर करण्याच्या नावाखाली कावेबाज ख्रिस्ती जगभरात चर्च बांधून स्थानिकांना विविध प्रलोभने देऊन स्वत:कडे ओढतात, तर धर्मांध मुसलमान ‘काफिर’ म्हणत मुसलमानेतरांवर आक्रमण करतात. संपूर्ण जग इस्लाममय अथवा ख्रिस्तीमय करण्याच्या संकुचित नि भयावह महत्त्वाकांक्षेपोटीच गेली १ सहस्र ४०० वर्षे हा हिंसाचार होत आहे, याला कोण काय करणार ? |