Morocco On Stray Dogs : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमुळे मोरोक्को ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारणार

जगभरातून प्राणीप्रेमींचा विरोध

प्रतिकात्मक छायाचित्र

रबात (मोरोक्को) – उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशाने ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला जगभरातून विरोध होत आहे. वर्ष २०३० मध्ये  मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल या ३ देशांनी मिळून फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी कोट्यवधी क्रीडाप्रेमी सामने पहायला येणार असल्याने मोरोक्कोने ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला.

मोरोक्कोमध्ये याविरोधात निषेध आंदोलन चालू आहे. प्राणी हक्क संस्थेकडून या घटनेचा विरोध करण्यात येत आहे. प्राणी हक्काच्या संदर्भात कार्य करणारे जेन गुडॉल यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेला पत्र लिहून या विषयात लक्ष घालण्यास सांगितले आहे. याविषयी मोरोक्को सरकार किंवा आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना यांच्याकडून अधिकृत भाष्य अद्याप करण्यात आलेले नाही.

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना जे त्रास सहन करावे लागतात, हे कधी या प्राणीप्रेमींना दिसत नाही किंवा ते या संदर्भात काहीच उपाययोजना करत नाही. अशांना कुत्र्यांची दया येते; मात्र त्रास सहन करणार्‍या माणसांची, लहान मुलांची नाही. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात आता जागतिक स्तरावर उपाय काढायला हवा, असेच यातून वाटते !