येत्या ३० जुलैपर्यंत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडणार  ! – बबनराव लोणीकर

पावसाने ओढ दिलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारने सिद्धता केली आहे. येत्या ३० जुलैपर्यंत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी १४ जुलैला येथे दिली.

सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्यातही ३८२ टँकरने पाणीपुरवठा चालू

पावसाळा चालू होऊन १ मास लोटूनही जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाई चालूच आहे. सध्या ३८२ टँकरद्वारे ३३५ गावे आणि १ सहस्र ९५० वाड्या-वस्त्यांवरील अनुमाने साडेसात लाख लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

‘जल’संकट !

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या जोडीला ‘नेमेचि येतो जीवघेणा दुष्काळ’ असा शब्दप्रयोगही सध्याच्या वातावरणाला लागू पडू शकतो. त्याचे कारणही तसेच आहे.

दुष्काळाचे सावट दूर करून महाराष्ट्राला ‘सुजलाम् सुफलाम्’ कर !

राज्यात चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर करून महाराष्ट्राला ‘सुजलाम् सुफलाम्’ कर, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त १२ जुलैला विठ्ठलाच्या चरणी घातले.

यापुढे मराठवाड्यात नव्या साखर कारखान्यांना अनुमती नाही

मराठवाड्यात सातत्याने पडणार्‍या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर येथे नवीन साखर कारखान्यांना अनुमती द्यायची नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ९ जुलै या दिवशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे येणार्‍या वारकर्‍यांना पाणीटंचाईचा फटका

आषाढी यात्रेनिमित्त संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात आलेल्या आहेत. दोन्ही पालखी सोहळ्यांतील दिंड्यांसह चालणार्‍या वारकर्‍यांना भंडिशेगाव, पिराची कुरोली, वाखरी या ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

वर्ष २०३० पर्यंत बर्‍याच शहरांतील पाणीच संपणार !

देशाच्या बर्‍याच शहरांमध्ये जलसंकटाने गंभीर रूप धारण केले आहे. भविष्यात याची तीव्रता आणखी वाढणार, हे निश्‍चित आहे. नीती आयोगाच्या एका अहवालानुसार वर्ष २०३० पर्यंत बर्‍याच शहरांतील पाणी जवळजवळ संपलेले असेल.

मुंबई-ठाण्याला पाणी पुरवणार्‍या जलाशयांत २० दिवस पुरेल इतकाच साठा

मुंबई आणि ठाणे येथे पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमध्ये पुढील २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शेष आहे. ठाण्यात सध्या ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे.

येत्या १० वर्षांत २१ शहरांना पाण्याची वानवा असणार

‘तिसरे महायुद्ध पाण्यासाठी लढले जाईल’, असे म्हटले जाते; मात्र त्यापूर्वी भारतात पाण्यावरून यादवी झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !

सातारा येथे पाण्याचा अपव्यय केल्याने नळजोडण्या तोडल्या

सातारा नगरपालिकेच्या वतीने पाण्याचा अपव्यय करणार्‍यांच्या विरोधात पाणीपुरवठा विभागाने मोहीम उघडली असून गेल्या आठवडाभरात १६ नळजोडण्या तोडल्या. यामुळे पाणी वाया घालवणार्‍या नागरिकांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये जागृती होत आहे


Multi Language |Offline reading | PDF