Women Raped N Burnt Alive In Congo : कांगो देशात कारागृहातील शेकडो महिलांवर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळले !  

किंशासा (काँगो) – आफ्रिका खंडातील काँगो देशातील गोमा शहरावर ‘एम् २३’ (मूव्हमेंट २३) नावाच्या बंडखोर संघटनेने नियंत्रण मिळवल्यानंतर येथील मुन्झेन्झे कारागृहातील शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचे आणि त्यांना जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या कारागृहातून ४ सहस्र बंदीवान पसार झाले आहेत.

एम् २३ या संघटनेला रवांडा देशाचे समर्थन आहे. वर्ष १९९६ -१९९७ आणि १९९८ ते २००३ या काळात झालेल्या युद्धात येथे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक विस्थापित झाले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने गोमामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठकीचे आयोजित केली आहे. ७ फेब्रुवारी या दिवशी जिनिव्हा येथे ही बैठक होणार आहे.