
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे भव्य हिंदु मंदिराची उभारणी केल्यानंतर आता ‘स्वामीनारायण संप्रदाय’ दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये असेच एक भव्य मंदिर उभारणार आहे. येथील सर्वांत व्यस्त आणि सुंदर अशा ‘लॅन्सेरिया कॉरिडॉर’मध्ये ३७ सहस्र चौरस मीटर भूक्षेत्रावर मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील ३ वर्षांत, म्हणजे वर्ष २०२७ पर्यंत पूर्ण होणारे हे मंदिर दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असेल, असे सांगितले जात आहे.
१. मंदिराच्या सांस्कृतिक संकुलाचे उद्घाटन संप्रदायाचे विद्यमान गुरु महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत झाले.
२. दुसर्या टप्प्यात २ सहस्र ५०० चौरस मीटरच्या संकुलात पसरलेल्या पारंपरिक मंदिराचे काम चालू होईल. हे मंदिर दक्षिण आफ्रिकेतील स्वामीनारायण संप्रदायाच्या मानवतावादी कार्याचे केंद्र असेल.
३. संप्रदायाचे दक्षिण आफ्रिकेचे प्रवक्ते हेमांग देसाई म्हणाले की, जर कोरोना काळात कोणताही अडथळा आला नसता, तर आम्ही हे मंदिर पुष्कळ आधीच बांधले असते. भारतातील जयपूर आणि तिरुपती यांसह विविध भारतीय शहरांमधून येथे देवतांच्या मूर्ती आणण्यात आल्या असून त्यांची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली आहे.
धार्मिक स्थळांचे पावित्र्य, कायदेशीर मर्यादा आणि सार्वजनिक शिस्त : एक सर्वसमावेशक विश्लेषण
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड