Mahakumbh Stampede : महाकुंभ दुर्घटना : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा न्यायालयीन चौकशीचा आदेश !

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

Prayagraj Mahakumbh Stampede : महाकुंभपर्वात चेंगराचेंगरी : परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर अमृत स्नान पार पडले !

मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी येथील त्रिवेणी संगमावर प्रंचड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत १५ भाविकांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जण घायाळ झाले. घायाळांना प्रयागराजमधील स्वरूपाणी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Union Home Minister Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिवेणी संगमात केले स्नान !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रयागराज दौर्‍यावर असून २७ जानेवारी या दिवशी त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यांच्यासमवेत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि आणि योगऋषी रामदेव बाबा यांनीही स्नान केले.

दक्षिण भारतातून १५० वर्षांनी श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांचा कुंभमेळ्यात सहभाग !

दक्षिण भारतातून तब्बल १५० वर्षांनी श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य यांनी कुंभमेळ्यात सहभाग घेतला आहे. शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती महाकुंभमेक्षेत्री आले आहेत. यापूर्वी श्री श्री विधुशेखर भारती यांच्या गुरूंचे गुरु कुंभमेळ्यात आले होते.

UP WAQF Land Under State Government : उत्तरप्रदेश वक्फ बोर्ड दावा करत असलेल्यांपैकी ७८ टक्के मालमत्ता सरकारी !

वक्फ बोर्ड विसर्जित करण्याला पर्याय नाही, हेच ही आकडेवारी सांगते ! जर असे केले नाही, तर पुढची पिढी क्षमा करणार नाही !

CM Yogi Aditynath : योगी आदित्यनाथ यांच्यासह मंत्र्यांचे संगमस्नान !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळातील जवळपास सर्वच मंत्र्यांनी २२ जानेवारी या दिवशी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यंनी गंगापूजन करून गंगा नदीची आरती केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कलाग्राम’ला भेट देऊन शिल्पकारांशी संवाद साधला !

मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी १९ जानेवारीला सेक्टर-७ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकारने स्थापन केलेल्या भव्यदिव्य सांस्कृतिक गाव ‘कलाग्राम’ला भेट दिली आणि शिल्पकारांशी संवाद साधला.

Sangam Snan : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंत्रीमंडळ २२ जानेवारीला संगमस्नान करणार !

महाकुंभमेळामध्ये २२ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री त्रिवेणी संगम येथे स्नान करणार आहेत. त्यानंतर मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कुंभक्षेत्राची हवाई पहाणी !

महाकुंभाच्या ७ व्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे महाकुंभमेळ्याची पहाणी करून महाकुंभ व्यवस्थेचा आढावा घेतला. २९ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येच्या दिवशी अंदाजे ८-१० कोटी भाविक स्नानासाठी येण्याची शक्यता आहे.

Akhilesh Yadav On Mahakumbh : (म्हणे), ‘महाकुंभपर्वासाठी ७ कोटी भाविक आल्याची आकडेवारी खोटी !’

वर्ष २०१३ मध्ये कुंभमेळ्याचे योग्य पद्धतीने नियोजन न केल्याने चेंगराचेंगरीचे प्रकार घडले, भाविकांना सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे हिंदूंविषयी कायम द्वेषाची भूमिका घेणार्‍या अखिलेश यादव यांना महाकुंभविषयी बोलण्याचा अधिकार नाही !