Ram Mandir Ayodhya : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया या प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र क्षणानंतर आपल्याला रचायचा आहे !

माझी अपार श्रद्धा आहे की, आज जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देश आणि विश्वातील कोपऱ्याकाेपऱ्यांत रामभक्तांना आली असणार ! २२ जानेवारी २०२४ हा दिनदर्शिकेतील दिनांक नाही, तर एका नव्या कालचक्राचा प्रारंभ आहे !

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सिद्धतेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पहाणी !

अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांच्या चालू असलेल्या सिद्धतेची पहाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९ जानेवारी या दिवशी केली.

Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान !

डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्‍चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.

Yogi Adityanath Appeal Shankaracharyas : श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी व्हावे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. आम्ही त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही.

Madarsa Teachers Honorarium Stopped : उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन रहित !

उत्तरप्रदेश सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेद्वारे तेथील शिक्षकांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद केले आहे.

Bomb Threat : श्रीराममंदिर आणि योगी आदित्यनाथ यांना बाँबस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणारे दोघे अटकेत !

अयोध्येतील श्रीराममंदिर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विशेष कृती दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांना बाँबस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणारे तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Abusing Yogi Adityanath : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंमद वसीम याला पोलिसांनी केली अटक !

हिंदुत्वनिष्ठांविषयी धर्मांधांच्या मनात किती द्वेष भिनला आहे, हेच यातून दिसून येते !

Ram Mandir Threat : जुबेर खान नावाच्या व्यक्तीकडून श्रीराममंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाँबद्वारे उडवून देण्याची धमकी !

भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा ई-मेल आला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अयोध्या, काशी आणि मथुरा यांसह सर्वच तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घाला !

येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत होणार्‍या श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.

Ram Mandir Ceremony : अयोध्येतील सर्व हॉटेल्स आणि अतिथीगृहे यांचे आरक्षण रहित !

आता २२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येला येऊ शकतील, ज्यांच्याकडे आयोजन समितीचे निमंत्रणपत्र असेल.