Union Home Minister Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिवेणी संगमात केले स्नान !

योगऋषी रामदेवबाबा यांच्यासमवेत योगी आदित्यनाथ यांनी केली योगासने !

त्रिवेणी संगम येथे स्नान करतांना अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि इतर संत

प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रयागराज दौर्‍यावर असून २७ जानेवारी या दिवशी त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यांच्यासमवेत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि आणि योगऋषी रामदेव बाबा यांनीही स्नान केले. त्यानंतर मंत्रोच्चारांच्या जयघोषात संतांनी शहा यांच्या कपाळावर चंदन लावले.

गंगा नदीची पूजा करतेवेळी अमित शहा
गंगा नदीची पूजा करतेवेळी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ

अमित शहा यांचा सत्कार करतांना योगी आदित्यनाथ
योगऋषी रामदेवबाबा यांच्यासमवेत योगी आदित्यनाथ यांनी केली योगासने !

स्नान झाल्यानंतर अमित शहा यांनी कुटुंबासमवेत त्रिवेणी संगमावर गंगा नदीचे पूजन आणि आरती केली. त्यानंतर अक्षय्य वटाचे दर्शनही घेतले. परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांनी शहा यांच्या आगमनापूर्वी हवन केले. शहा यांनी जुना आखाड्यात साधू-संत यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासमवेत भोजनही केले.