साधना केल्यानेच निरंतर आनंदाची प्राप्ती होते ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

पू. (अधिवक्ता) कुलकर्णी म्हणाले, ‘‘सनातनचा आश्रम ही पवित्र भूमी आहे. स्वतःतील स्वभावदोष घालवून अनेक जण संतपदापर्यंत पोचले आहेत. शिबिराचे ३ दिवस आश्रामतील चैतन्य ग्रहण करून साधना करूया.’’

कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार होणे शक्य ! – सागर जावडेकर, संपादक, दैनिक ‘तरुण भारत’, गोवा आवृत्ती

देव, देश आणि धर्म हे विषय आपल्या संस्कृतीशी जोडलेले असल्याने या गोष्टींचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कीर्तन हे लोकशिक्षण आणि प्रबोधन यांचे प्रभावी माध्यम आहे.

नागपूर येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने ‘सी.पी.आर्. प्रशिक्षण’ पार पडले !

प्रशिक्षक म्हणून आलेल्या डॉक्टरांनी ‘आरोग्य साहाय्य समितीचा हा उपक्रम जाणून घेऊन समिती चांगले प्रयत्न करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिद्धता दर्शवली.

ज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

योग्य नियोजनकौशल्य आणि निर्णयक्षमता या गुणांच्या आधारे खर्‍या अर्थाने ‘नेतृत्व विकास’ साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाने हे गुण स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती सेवकांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा !

पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती सेवकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करा ! – पू. (सौ.) भावना शिंदे

शिबिरार्थींना संबोधित करतांना पू. (सौ.) भावना शिंदे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे दीप आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करू शकतो.

मंगळुरू (कर्नाटक) येथे राज्यस्तरीय साधनावृद्धी आणि कौशल्य विकास शिबिर पार पडले !

या शिबिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे जीवनातील महत्त्व, हिंदु राष्ट्राविषयी सामाजिक माध्यमांद्वारे धर्मकार्य कसे करू शकतो, आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात शाळांची गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा !

या कार्यशाळेत पालटत्या काळानुसार शिक्षकांना अध्यापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक काळात अध्यापन कसे करावे ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन शिक्षकांना या कार्यशाळेतून करण्यात येणार आहे.

सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठीच्या कार्यशाळा पार पडल्या !

कार्यशाळांमध्ये उपस्थित सर्व जिज्ञासूंनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये साधनेविषयी श्रद्धा आणि तळमळ वाढण्यास साहाय्य झाले.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

आजकाल प्रत्येकच क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे, याविरुद्ध लढण्यासाठी आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. अशा अनेक घटनांना सामोरे जाण्यासाठी अधिवक्त्यांनी साधना करणे, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक आहे.