सोलापूर जिल्ह्यात शाळांची गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा !

शाळांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – सध्या राज्यात कोरोना संसर्गाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने उपाययोजना म्हणून शाळा चालू होण्यापूर्वी शाळेची संपूर्ण स्वच्छता आणि सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. शाळांची गुणवत्ता वाढावी यांसाठी यंदा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा आणि तालुका स्तरावर गुणवत्ता अभियानाअंतर्गत शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत पालटत्या काळानुसार शिक्षकांना अध्यापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक काळात अध्यापन कसे करावे ? याविषयी सविस्तर मार्गदर्शन शिक्षकांना या कार्यशाळेतून करण्यात येणार आहे.