दिवाळीनिमित्त आकाशकंदिल वितरण करतांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये साधकांनी दिवाळीनिमित्त आकाशकंदिल आणि भेटसंच वितरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न येथे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त येणार्‍या साधकांची निवासव्यवस्था स्वतःच्या घरी भावपूर्ण करतांना आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जेव्हा मला सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून समजले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अन्य जिल्ह्यातील साधक आमच्या ‘हॉटेल गुरुप्रसाद’ (विश्रामगृह) येथे येणार आहेत, तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली…

स्वीकारण्याची वृत्ती असलेला आणि तळमळीने सेवा करणारा सोलापूर सेवाकेंद्रातील ५६ टक्के अध्यात्मिक पातळी असणारा कु. भावेश (ओम) प्रकाश सूर्यवंशी (वय १६ वर्षे) !

प्रारंभी ओमला सेवाकेंद्रात भांडी घासण्याची सेवा आवडत नसे; पण याविषयी त्याच्याशी बोलल्यावर त्याने प्रायश्चित्त म्हणून आठवडाभर भांडी घासण्याचीच सेवा केली.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जुलै २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात मी सहभागी झाले होते. त्या वेळी मला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्टी सेवा करणार्‍या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

आजच्या भागात आपण ‘पू. दीपाली व्यष्टी भावाकडून समष्टी भावाकडे कशा वळल्या ? अध्यात्मप्रसाराची सेवा शिकण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, ही सूत्रे पहाणार आहोत.  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्टी सेवा करणार्‍या सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

‘भाव तिथे देव’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या पू. दीपाली मतकर ! पू. दीपालीताईंचा साधनाप्रवास पहाता ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणार्‍या पू. दीपालीताई यांची आरंभी व्यष्टी प्रकृती होती.

पश्चिम महाराष्ट्रात गदापूजन करून हनुमंताला हिंदु राष्ट्रासाठी साकडे !

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे २७० हून अधिक ठिकाणी गदापूजन, सोलापूर, लातूर, बीड येथे ९० हून अधिक ठिकाणी गदापूजन.

सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या सहवासाचा लाभ करून घेऊन तो आनंद अन् चैतन्य कुटुंबियांना अनुभवायला देणारी अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील कु. प्रीती चोरमले (वय २३ वर्षे) !      

‘माझी मुलगी कु. प्रीती हिचा आज चैत्र पौर्णिमेला वाढदिवस आहे. ती काही दिवसांसाठी सोलापूर येथील सेवाकेंद्रात रहायला गेली होती. तिथून ती घरी परत आल्यावर तिच्याशी बोलतांना मला जाणवलेली सूत्रे आणि तिच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत. 

मैया, ओ मेरी मैया (पू. दीपाली मतकर) ।

मी सोलापूर सेवाकेंद्रात २ दिवस रहायला गेले होते. ३० ऑगस्‍ट २०२१ या दिवशी गोकुळाष्‍टमीला भावजागृतीचा प्रयोग करतांना मला सुचलेले काव्‍य पुढे दिले आहे.

बार्शी येथील सौ. सोनल कोठावळे यांना पू. दीपाली मतकर यांच्या नावाचा सुचलेला अर्थ

सद्गुरूंच्या पावलावर पाऊल टाकत साधकांच्या प्रगतीचा ध्यास घेणारी आमची ताई ।