मंगळुरू – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटक राज्यातील धर्मप्रेमींसाठी येथे ३ दिवसांचे साधनावृद्धी आणि कौशल्य विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे जीवनातील महत्त्व, हिंदु राष्ट्राविषयी सामाजिक माध्यमांद्वारे धर्मकार्य कसे करू शकतो, आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. शिबिराच्या समारोप प्रसंगी काही उद्योगपतींनी साधना चालू केल्यावर त्यांना आलेले अनुभव शिबिरार्थींना सांगितले.