भारताला हवा असलेला खलिस्तानी आतंकवादी हरप्रीत सिंह याला अमेरिकेत झाली आहे अटक !

वॉशिंग्टन – एफ्.बी.आय.चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल यांनी भारताला आश्वासन दिले आहे की, प्रथम गुन्हेगार असलेला आणि नंतर आतंकवादी बनलेला हरप्रीत सिंह उपाख्य हॅपी पासिया याच्या अटकेनंतर आता न्याय मिळेल. पटेल यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, अटक करण्यात आलेला हरप्रीत सिंह हा भारत आणि अमेरिका येथील पोलीस ठाण्यांवर आक्रमण करण्याच्या षड्यंत्रात सहभागी होता. एफ्.बी.आय.ने स्थानिक, तसेच भारतातील त्यांचे साथीदार यांच्या सहकार्याने उत्तम कामगिरी केली. एफ्.बी.आय. हिंसाचार करणार्यांचा पाठलाग यापुढेही करतच राहील.
संपादकीय भूमिका
|