Brittany Fortinberry Arrested : अमेरिका : महिला शिक्षिकेने १० मुलांवर केले लैंगिक अत्याचार !

इंडियानापोलीस (अमेरिका) – अमेरिकेतील इंडियाना राज्यात एका शिक्षिकेचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. या महिला शिक्षिकेने १० अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केले. शिक्षिकेने मुलांना अमली पदार्थ देऊन बेशुद्ध केले आणि घरात ठेवलेली लैंगिक खेळणी दाखवली. यानंतर त्यांच्यासमवेत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी ३१ वर्षीय शिक्षिका ब्रिटनी फोर्टिनबेरी हिला अटक करण्यात आली आहे.

१. एका १५ वर्षांच्या पीडित मुलाच्या आजीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

२. पीडित मुलाने पोलिसांना सांगितले की, या शिक्षिकेच्या लैंगिक अत्याचाराला १० हून अधिक मुले बळी पडलेली असू शकतात. या शिक्षिकेवर अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे.

३. पीडित मुलाने पोलिसांना सांगितले की, शिक्षिकेने त्याला अश्‍लील छायाचित्रे आणि संदेश पाठवले. ‘स्नॅपचॅट’द्वारे त्याच्याशी संपर्क साधला आणि धमकावले की, ‘जर त्याने लैंगिक संबंधांविषयी कुणाला सांगितले, तर ती आत्महत्या करेल.’ शिक्षिका त्या मुलाला इंडियानामधील एका शहरात सहलीला घेऊन गेली आणि तिथे त्याच्याशी अश्‍लील वर्तन केले. पोलिसांनी शिक्षिकेच्या घराची झडती घेतली आहे.

४. ब्रिटनीने विद्यार्थ्यांना सांगितले की, तिला त्यांच्यासमवेत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचे स्वप्न पडले. एका पीडित मुलाने सांगितले की, शाळेत शिक्षकांवर विश्‍वास ठेवला पाहिजे; पण हे खूप विचित्र होते.

संपादकीय भूमिका

अमेरिकी समाजाची नीतीमत्ता कोणत्या थराला गेली आहे, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारताने हिंदु मूल्यांची कास धरली नाही, तर त्याची स्थितीसुद्धा या पाशवी विकृतीसारखीच होणार, हे जाणा !