इगतपुरी (नाशिक) येथे विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळला चाकू, निरोध आणि तंबाखूजन्य पदार्थ !

चित्रविचित्र केशरचना करणार्‍या विद्यार्थ्यांचे उपमुख्याध्यापकांनी केस कापले

नाशिक – येथील इगतपुरी परिसरातील घोटीच्या एका खासगी शाळेत इयत्ता ९ वीतील ५ – ६ विद्यार्थ्यांच्या दप्तरात चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, निरोध आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळले. उपमुख्याध्यापकांनी अचानक दप्तरांची पहाणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांना बोलावून संबंधित विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी चित्रविचित्र केशरचना केली होती. उपमुख्याध्यापकांनी या विद्यार्थ्यांचे केस कापले. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी यापुढेही प्रतिदिन अशीच पहाणी चालू रहाणार असल्याचे उपमुख्याध्यापकांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • अशी भावी पिढी देशाला प्रगतीपथावर नव्हे, तर रसातळालाच नेईल ! विद्यार्थ्यांवर नीतीमत्तेचे संस्कार होण्यासाठी पालक, शिक्षक आणि सरकार यांनी प्रयत्न करायला हवेत !
  • सध्याची बिकट परिस्थिती पहाता सर्वच विद्यार्थ्यांच्या दप्तरांची पडताळणी करावी का ? हे शाळांनी वेळीच ठरवायला हवे !