Kannur Madrasa Teacher Sentenced : केरळमध्ये वासनांध मदरसा शिक्षकाला १८७ वर्षांचा कारावास !

कन्नूर (केरळ) – कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदी चालू असतांना एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २ वर्षे सतत लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी मदरसा शिक्षक ४१ वर्षीय महंमद रफी याला तालिपरंब जलद गती विशेष न्यायालयाने १८७ वर्षांचा कारावास आणि ९ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायाधीश आर्. राजेश यांनी हा निकाल दिला. (जलद विशेष न्यायालयाने ५ वर्षांनी निकाल देणे, हा त्या पीडित मुलीवर एकप्रकारचा अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

महंमद रफी याने मार्च २०२० मध्ये पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास चालू केले होते. त्याविषयी कुणालाही न सांगण्याची धमकी त्याने मुलीला दिली. मुलगी तणावात दिसल्याने पालकांनी तिला समुपदेशन केंद्रात नेले. तेथे तिने तिच्यावरील लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. या तक्रारीच्या आधारे पळयंगडी पोलिसांनी महंमद रफीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण केले होते.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधाना शरीयतनुसार दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केल्यास त्याविषयी कुणाला आश्चर्य वाटू नये !