Corrupt Govt Depts : राज्यातील सर्वच सरकारी खात्यांमध्ये लाचखोरांचा भरणा ; वर्षभरात ९८९ जणांवर कारवाई !

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छीः थू’ होईल, असे केल्यासच भ्रष्टाचाराला काही प्रमाणात तरी आळा बसेल !

Global Hunger Index 2023 : जागतिक उपासमार निर्देशांक जाणूनबुजून भारतातील खरी परिस्थिती दाखवत नाही !

जर या निर्देशांकावर विश्‍वास ठेवायचा झाला, तर गेल्या ७६ वर्षांत भारताची उपासमारीच्या संदर्भातील ही दुर्दशा देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसमुळेच झाली आहे.

गोव्यातील संभाव्य ९९ गावांपैकी ४० गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळली जाण्याची शक्यता !

पश्चिम घाटाच्या पट्ट्यात येणारे आणि उंचीवरील क्षेत्र, तसेच जैवविविधता आदी निकषांवर क्षेत्रांचा अंतर्भाव होणार आहे. रहिवाशांना घरांचे दुरुस्तीकाम, शेतीकामे आणि निर्धारित केलेले व्यवसाय करण्यावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नायजेरियन नागरिकाकडून अडीच लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यात अमली पदार्थ व्यवसायाप्रकरणी बहुतांश नायजेरिन नागरिकांना पकडण्यात येते. राज्यातील नायजेरियन नागरिकांच्या कृतींवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून येते !

गोव्यात ९ मासांत झालेल्या २ सहस्र ९० अपघातांत २१० जणांनी गमावले प्राण

आकडेवारीनुसार राज्यात दिवसाला सरासरी ८ अपघात होतात, तर प्रत्येक ३१ घंट्यांत एकाचा अपघातामुळे मृत्यू होत असतो.

ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याची मुसलमान पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली

‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

गोव्यात किशोरवयीन मुली गर्भवती होण्याचे वाढते प्रकार चिंताजनक ! 

धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्‍लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !

मागील साडेचार वर्षांत गोव्यातील साडेसहा सहस्र युवक मद्य किंवा अमली पदार्थ व्यसनांच्या आहारी !

सनबर्नसारख्या कार्यक्रमांत अमली पदार्थ, मद्य यांचा सर्रास होत असलेला वापर या स्थितीला उत्तरदायी आहे ! युवकांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी सर्वांना साधना शिकवणे आवश्यक आहे !

कॅनडामध्ये आता निवडणुका झाल्या, तर जस्टिन ट्रुडो यांचा होणार पराभव !

 ‘इप्सोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डैरेल ब्रिकर म्हणाले की, कॅनडात कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. देशाच्या दिशेवरून असंतोष असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.

गोव्यात वर्ष २०११ पासून ३ सहस्र २८६ लोकांनी केल्या आत्महत्या !

शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक ! साधनेमुळे प्राप्त होणार्‍या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. ‘प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे’, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते.