|
प्रयागराज – प्रयागराज येथे महाकुंभपर्वासाठी विमानाने जाणे भाविकांना आवाक्याबाहेरचे झाले आहे. विमान आस्थापनांनी विमानाच्या भाड्यात ५ सहस्र रुपयांहून थेट २२ सहस्र रुपयांपर्यंत वाढ केली आहे. प्रयागराजला जाण्यासाठी विमान कंपन्यांकडून १० जानेवारीपासून विशेष विमानसेवा चालू करण्यात येणार आहे. १० जानेपासून पुण्याहून प्रयागराजला जाण्यासाठी तब्बल २७ सहस्र रुपये, बेंगळुरुहून प्रयागराजला जाण्यासाठी १९ सहस्र रुपये, तर मुंबईहून १८ सहस्र रुपये इतके भाडे आहे. एका कुटुंबातील ४-५ जणांनी जरी प्रयागराजला जायचे म्हटले, तरी साधारण १ लाख रुपयांच्या आसपास खर्च केवळ भाड्यावरच होणार आहे. विमान कंपन्यांच्या या मनमानीपणाविषयी भाविकांमध्ये अप्रसन्नता आहे.
या शहरांमधून १० जानेवारीपासून प्रयागराजसाठी असेल विशेष विमानसेवा !
नवी देहली, जयपूर, चंडीगड, भुवनेश्वर, अमृतसर, डेहराडून, लक्ष्मणपुरी, गौहत्ती, कोलकाता, विलासपूर, रायपूर, इंदूर, जबलपूर, भोपाळ, बेंगळुरु, चेन्नई, भाग्यनगर, पुणे, नागपूर आणि कर्णावती.