भोजशाळेच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

धार (मध्यप्रदेश) – येथील भोजशाळेच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाविरुद्धच्या मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर न्यायालयाने ‘या जागेवर कोणत्याही प्रकारचे उत्खनन करू नये; ज्यामुळे त्याचे मूळ स्वरूप पालटेल’, स्पष्ट केले आहे. २२ मार्चपासून येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे.

सौजन्य IBC24

सर्वोच् न्यायालयाने म्हटले की, ज्या ठिकाणी पूजा केली जाते आणि ज्या ठिकाणी मुसलमान नमाजपठण करतात, तेथे जाण्याचे प्रवेश वेगवेगळे आहेत. येथे मुसलमान विनाअडथळा नमाजपठण करत आहेत.