मुंबईत महिलांसाठी रात्रीचा रेल्वेप्रवास असुरक्षित ! – रेल्वे पोलिसांच्या अहवालाचा निष्कर्ष

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांचा रात्रीचा रेल्वेप्रवास असुरक्षित असल्याचा निष्कर्ष रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणातून काढला आहे. रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाने १ ते ३१ मार्च या कालावधीत मुंबई उपनगरीय रेल्वेतील महिला प्रवाशांचे अनुभव, समस्या आणि शिफारसी यांचा आढावा घेत हे सर्वेक्षण केले.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत २१ ऑनलाईन प्रश्‍नावलीच्या सर्वेक्षणात ३ सहस्र महिला प्रवाशांनी सहभाग घेतला. अनेक महिलांनी रात्री ९ नंतर, २८ टक्के महिलांनी रात्री १० नंतर, ४० टक्के महिलांनी रात्री ११ नंतर आणि ४२ टक्के महिला प्रवाशांनी मध्यरात्री धावणार्‍या लोकलमधील प्रवास असुरक्षित असल्याचे म्हटलेे. लोकलचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी उपाययोजनांसाठी अनेकींनी त्यांचे मत नोंदवले आहे.

संपादकीय भूमिका 

  • शासनासह पोलिसांनाही ही आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. ही स्थिती का ओढवली आहे ? याचा गांभीर्याने विचार केला, तर यावर परिणामकारक उपाययोजना निघू शकतात !
  • धर्माचरण करणारा नैतिक समाज असणारे स्त्रियांसाठी सुरक्षित रामराज्य स्थापन झाल्यावरच ही समस्या सुटेल !