पिंपरीतील (पुणे) २४ अनधिकृत होर्डिंगधारक आणि मालक यांविरुद्ध गुन्हे नोंद !

पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या २४ अनधिकृत होर्डिंगधारक आणि जागामालक यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले आहेत. महापालिका प्रशासनाने होर्डिंगधारकांसह बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग्ज काढून घेण्याची सूचना केली होती. त्यानंतरही अनेकांनी होर्डिंग्ज काढले नाहीत. त्यामुळे महापालिकेने १५ ते २० मे २०२४ या कालावधीत अनधिकृत होर्डिंग्जचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये २४ होर्डिंग्ज अनधिकृत आढळून आले. त्यांपैकी २० हटवण्यात आले आहेत. त्यामध्ये ९ होर्डिंग्ज महापालिकेच्या वतीने पाडण्यात आले, तर ११ अनधिकृत होर्डिंग्ज स्वत: होर्डिंगधारकांच्या वतीने हटवण्यात आले आहेत. सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सर्व होर्डिंगधारकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग्ज पाडण्याची कारवाई चालू आहे. होर्डिंग्जचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाई पुढेही चालूच रहाणार आहे. याविषयीच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

गुन्हे नोंद करण्यासमवेत लवकरच त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! अशी कारवाई नेहमीच केली तर शहरात अनधिकृत होर्डिंग उभे रहाणार नाहीत !