अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या भावाचे तालिबानला समर्थन !

डावीकडून चौथ्या स्थानावर हशमत घनी अहमदजई

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घनी अहमदजई यांनी तालिबानला समर्थन दिले आहे. हशमत घनी अहमदजई यांनी तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय अल्हाज खलील-उर्-रहमान हक्कानी या तालिबानी नेत्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे.