नूपुर शर्मा यांनी क्षमा मागू नये ! – खासदार गीर्ट विल्डर्स, नेदरलँड्स

डावीकडून खासदार गीर्ट विल्डर्स आणि नूपुर शर्मा

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – ‘मला वाटले होते की, भारतात शरिया न्यायालये नाहीत. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी सत्य बोलल्याने त्यांनी कधीच क्षमा मागू नये. उदयपूरच्या घटनेसाठी नूपुर शर्मा नव्हे, तर कट्टरतावादी असहिष्णु जिहादी मुसलमान हेच उत्तरदायी आहेत. नुपूर शर्मा या ‘हिरो’ आहेत’, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले. या ट्वीटमध्ये त्यांनी #IsupportNupurSharma या हॅशटॅगचा (एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी वापरलेले शब्द) वापर करून नूपुर शर्मा यांचे समर्थन केले आहे.