यासीन मलिक याचे समर्थन करणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेचा भारताकडून निषेध

‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने केले आतंकवादी कारवायांचे समर्थन !

नवी देहली – आतंकवादासाठी अर्थपुरवठा आणि शस्त्रपुरवठा केल्याच्या प्रकरणी काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर टीका करणार्‍या इस्लामी देशांच्या संघटनेचा भारताने निषेध केला.

‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे.

या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.