चीनकडून उइगर मुसलमानांविरुद्ध वापरल्या जाणार्‍या दमनतंत्राचे पाककडून समर्थन !

पाकला हीच भाषा समजते, हे भारतीय शासनकर्ते आतातरी लक्षात घेतील का ?

पाकचे पंतप्रधान इम्रान खान व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

इस्लामाबाद – चीनकडून त्यांच्या शिंजियांग प्रांतातील उइगर मुसलमानांच्या चालू असलेल्या दमनतंत्राचे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी समर्थन केले आहे. चिनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करतांना त्यांनी हे विधान केले. चीनकडून उइगर मुसलमानांचा अमानवीय छळ चालू असून संयुक्त राष्ट्रांनी, तसेच जगभरातील मानवाधिकार संघटनांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. (या मानवाधिकार संघटनांना कधी विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी कळवळा कसा वाटत नाही ? त्यांना काश्मीरमधून हाकलून देणार्‍या जिहादी आतंकवाद्यांवर या संघटना कधी आक्षेप का घेत नाहीत ? कि त्यांच्या लेखी काश्मिरी हिंदूंना मानवाधिकार नाहीत ? – संपादक) चीनमधील शी जिनपिंग शासनाचे कौतुक करत ‘हे शासन म्हणजे लोकशाहीचा उत्तम नमूना आहे’, अशी मुक्ताफळेही इम्रान खान यांनी या वेळी उधळली.