(म्हणे) ‘गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून बंगालमध्ये गोहत्या होत असतांना ती कुणीही रोखू शकत नाही !’

गोमांस भक्षण करण्याच्या कृतीचे अश्‍लाघ्य समर्थन करणारे तृणमूल काँग्रेसचे धर्मांध मंत्री !

  • बंगालचे धर्मांध मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी हे हेतूपुरस्सर असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशात गोहत्याबंदी कायदा राबवून त्याची प्रभावी कार्यवाही करावी. असे केले, तरच सिद्दीकुल्लाह चौधरी यांच्यासारखे धर्मांध वठणीवर येतील !
  • हिंदूबहुल भारतात धर्मांध गोहत्येचे उघड समर्थन करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
ममता बॅनर्जी आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी

कोलकाता (बंगाल) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बंगालमध्ये येऊन म्हणतात, ‘जर येथे भाजपची सत्ता आली, तर आम्ही गोहत्या थांबवू.’ गेल्या १ सहस्र २०० वर्षांपासून बंगालमध्ये गोहत्या होत आहे. प्रत्येक जण गोमांस खात आहे. यात मुसलमान आणि अन्य लोक हेही सहभागी आहेत. अशा प्रकारच्या घोषणा हिंदु मानसिकतेला पुढे करण्याचा प्रयत्न आहे, असा फुकाचा आरोप बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांनी केला.

‘तुम्ही गोहत्येचे समर्थन करता का ?’, असा प्रश्‍न विचारण्यात आल्यावर सिद्दीकुल्ला म्हणाले की, पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि विदेशी पर्यटकांमध्ये गोमांस खाणे सामान्य गोष्ट आहे. गोमांसावर प्रतिबंध लावले, तर १०० टक्के बंगाली लोकांना राग येईल. जर आम्ही गोमांस खाल्ले नाही, तर या जनावरांना कुठे ठेवणार ? आम्हालाच त्यांना खाऊ घालावे लागणार आहे. बंगालमधील अधिकतर गोमांस निर्यातक हिंदू मारवाडी आहेत, मुसलमान नाही, असा दावाही त्यांनी केला.