बालविवाह न रोखणारे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हा नोंद करण्याविषयी पत्र पोलिसांना दिले ! – रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महिला राज्य आयोग

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने सौ. रूपाली चाकणकर यांनी विधानभवनातील पत्रकार कक्षाला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी बोलतांना वरील माहिती दिली.

संतवीर आणि ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक नाही ! – सातारा पोलीस

कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस

खासदार नवनीत राणा यांच्या ‘ऑडिओ क्लिप’विषयी महिला आयोगाने मागितला खुलासा !

या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी योग्य तो खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे निर्देश महिला आयोगाने त्यांना दिले आहेत.

‘सुल्ली डील’ या ‘ॲप’वर मुसलमान महिलांची छायाचित्रे ‘अपलोड’ करून त्यांची किंमत देण्यात आल्याच्या प्रकरणी गृहमंत्र्यांचा कारवाईचा आदेश !

सामाजिक माध्यमांवरून अशा प्रकारे महिलांचा लिलाव करण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. अशा प्रकारे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांचाही लिलाव चालू असल्याची शेकडो प्रकरणे पुढे आली आहेत. त्यांच्याविषयी  कारवाई का होत नाही ?

बलात्कारीत महिलांची मानहानी थांबण्यासाठी राज्यात ‘वन स्टॉप प्लेस’ कार्यपद्धती राबवणार ! – सौ. रूपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

पीडित महिलेवरील अत्याचाराच्या चौकशीची प्रक्रिया अनेक मास चालते. ही चौकशी एका आठवड्यात पूर्ण व्हावी, यासाठी ‘वन स्टॉप प्लेस’ ही योजना राबवण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड !

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राज्यशासनाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.

अनुभवी महिला नसेल, तर किमान रावणाला साहाय्य करणारी शूर्पणखा पदावर बसवू नका !

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मागील दीड वर्षापासून रिक्त आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राजस्थान महिला आयोगाची रिक्त पदे तातडीने भरण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश !

‘लष्कर-ए-हिंद’ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांच्या जनहित याचिकेचा परिणाम !

शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमा !

शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमण्याचे आवाहन गोवा राज्य महिला आयोगाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांना केली आहे.

बहुतांश तरुणी स्वतःहून संबंध ठेवतात अन् प्रेमभंग झाल्यावर बलात्काराची तक्रार करतात ! – छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक

समाजातील नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! समाजाला आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !