मुंबई, १७ एप्रिल (वार्ता.) – ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष भेटून सविस्तर माहिती देऊन त्यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. याची गंभीर नोंद घेऊन राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना अन्वेषण करून ४८ घंट्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी नवी मुंबई आणि नेरूळ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांना अटक करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली आहे.