काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासहित अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

देहलीतील ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ३०० पोलीस घायाळ !

पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्‍या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?

रोम (इटली) येथील भारतीय दूतावासात खलिस्तान समर्थकांकडून तोडफोड

खलिस्तानी जगात सर्वत्र पसरले असून त्यांचा भारताला धोका आहे. ‘हा आतंकवाद मूळापासून नष्ट न केल्यास तो अधिकाधिक उग्र रूप धारण करणार’, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पावले उचलावीत !

देहलीत हिंसाचार भडकावल्याचा कुख्यात गुंड लक्खा सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप !

एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्‍यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !

देहलीत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार ! : दोघांचा मृत्यू  

अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्‍यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !

आंदोलन चिघळवले !

काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा होणे अपेक्षित होते. आपत्काळाच्या अनुषंगाने पुढील काळ यापेक्षाही कठीण स्थिती घेऊन येणार आहे. त्याची ही नांदीच म्हणावी लागेल !

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !

कोटी कोटी प्रणाम !

• वळपे, पेडणे येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा आज जत्रोत्सव !
• गुरु गोविंदसिंह जयंती (परंपरागत)

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, श्रीराममंदिराच्या आंदोलनात पहिली ‘एफ्.आय.आर्.’ हिंदूंविरुद्ध नव्हे, तर शिखांविरुद्ध झाली होती. यावरून ‘शीख हे सनातन हिंदु धर्माचे अभिन्न अंग आणि धर्मरक्षक योद्धा आहेत’, हे सिद्ध होते.

केंद्र सरकारने खलिस्तान्यांवर कारवाई करावी !

शेतकरी आंदोलनाविषयी सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने सांगितले की, या आंदोलनामध्ये खलिस्तान्यांनी घुसखोरी केली आहे. याविषयीचा गुप्तचर विभागाचा अहवाल सादर करू.