रोम (इटली) येथील भारतीय दूतावासात खलिस्तान समर्थकांकडून तोडफोड

खलिस्तानी जगात सर्वत्र पसरले असून त्यांचा भारताला धोका आहे. ‘हा आतंकवाद मूळापासून नष्ट न केल्यास तो अधिकाधिक उग्र रूप धारण करणार’, हे लक्षात घेऊन भारत सरकारने पावले उचलावीत !

‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणूनही त्यांनी भिंतीवर लिहिले होते

रोम (इटली) – येथील भारतीय दूतावासामध्ये घुसून खलिस्तान समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिन साजरा करण्याच्या काही वेळापूर्वी ही घटना घडली. भारताने या तोडफोडीविषयी इटलीकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

(सौजन्य : WION)

तोडफोड करणारे खलिस्तानचे झेंडे घेऊन आले होते. ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणूनही त्यांनी भिंतीवर लिहिले होते. या तोडफोडीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.