कोरोना महामारीच्या संघर्षमय काळात जिज्ञासूंसाठी संजीवनी ठरलेला सनातन संस्थेचा ‘ऑनलाईन साधना सत्संग’ !

कोरोना महामारीतील समाजाची स्थिती लक्षात घेऊन सर्वांना आधार देण्यासाठी दळणवळण बंदी काळात; म्हणजे वर्ष २०२० पासून सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन साधना सत्संग’ या उपक्रमाला आरंभ करण्यात आला.

साधना सत्संग उपक्रमामुळे साधकांना झालेले लाभ !

कोरोना महामारीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन साधना सत्संगा’चा समाजातील जिज्ञासूंप्रमाणे साधकांनाही या उपक्रमाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.

‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत सर्वत्र सदा !

‘सनातन संस्था’ हे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचेच एक रूप असून ‘अधिकाधिक जिज्ञासू सनातन संस्थेशी जोडले जाऊन त्यांना साधना करण्याची स्फूर्ती मिळो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !

सनातनच्या साधकांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या वंदनीय असलेल्या गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी ! : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी ‘सनातन संस्था’ स्थापन केली. त्यांचे अध्यात्मप्रसाराचे आणि साधक घडवण्याचे व्यापक कार्य त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ समर्थपणे सांभाळत आहेत.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाची फलश्रुती म्हणजे, सनातनच्या सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेची निर्मिती ! – डॉ. जयंत बाळाजी आठवले

फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.

सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !

सनातनच्या सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदेची माहिती आणि अनुक्रमणिका या लेखात दिली आहे. सर्वांनी या चैतन्यमय ग्रंथसंपदेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या.

सनातन धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी सनातन संस्था !

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.

विशेषांकाद्वारे सनातन संस्थेची महती सांगायला मिळाल्याविषयी कृतज्ञता !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी (२५ व्या) वर्धापनदिनानिमित्त ‘सनातन संस्थेच्या व्यापक कार्याची केवळ तोंडओळख’ म्हणावी, अशी माहिती या ‘सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव’ विशेषांकात दिली आहे. सनातन संस्थेच्या दिव्य, अलौकिक कार्याविषयीची माहिती जिज्ञासू वाचकांपर्यंत पोचवण्याची संधी आम्हाला प्राप्त झाल्याविषयी कृतज्ञता !

मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा लय करायला शिकवणारी सनातन संस्था !

‘ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे; पण यामध्ये सर्वांत मोठा अडथळा असतो तो मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा ! विविध साधनामार्ग आणि संप्रदाय मन, बुद्धी, चित्त अन् अहं यांबाबत बरीच तात्त्विक माहिती  सांगतात.

मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !